जिल्हा मेळावा – नागपूर अहवाल

नागपूर जिल्हा मूल्यवर्धन मेळावा – ४ मार्च २०२० : अहवाल

मूल्यवर्धन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शिक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद – श्री. शांतिलाल मुथ्था

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज संस्थांच्या सर्वच्या सर्व ६७००० शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. स्वातंत्र्य काळानंतरचा मूल्यशिक्षणाचा सरकारी शाळांमधील हा भारतातील सर्वात मोठा प्रयोग आहे.

प्रदर्शनाचे उदघाटन :

 

या निमित्ताने मूल्यवर्धन नागपूर जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ४५०० शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स प्रदर्शनाचे उदघाटन मनपाचे महापौर मा. श्री. संदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. शिक्षणाधिकारी श्री. चिंतामण वंजारी, मनपा. शिक्षणाधिकारी श्रीमती प्रिती मिश्रीकोटकर, DIET प्राचार्य श्रीमती हर्षलता बुराडे, SCERT चे विभागीय संचालक श्री.  रविंद्र रमतकर, श्री. प्रफुल्ल पारख, श्री. रजणीश जैन उपस्थित होते.

श्री. रजनीश जैन , श्री. प्रफुल्ल पारख, श्री. शांतीलाल मुथ्था, मा. श्री. संदीप जोशी (महापौर मनपा), श्रीमती प्रिती मिश्रीकोटकर (शिक्षणाधिकारी मनपा), श्रीमती हर्षलता बुराडे (DIET प्राचार्य ), श्री. विजय उदापुरकर

जिल्हा मेळावा उदघाटन :

 

मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्याला विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार व जि. प. शिक्षण सभापती श्रीमती भारती पाटील हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मा. विभागीय आयुक्त म्हणाले, “सध्या मूल्य हे वरवर दाखविण्यासाठी असल्याचे दिसते. उदा. नुसतं पाया पडणे म्हणजे आज्ञाधारक असे आपण म्हणतो, यापेक्षा मूल्यवर्धनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजवून देशाचा एक कर्तबगार नागरिक बनू शकेल, ही मूल्यवर्धनची संकल्पना चांगली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः या कार्यक्रमाची आढावा बैठक घेतली होती. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडत असल्याचे दिसून आले असे मत व्यक्त केले. जि. प. शिक्षण सभापती मॅडम यांनी सरकारी शाळांबरोबरच खाजगी शाळांमध्ये मूल्यवर्धन सुरू करण्याची सूचना केली.

 

या जिल्हा मेळाव्यासाठी कविवर्य सुरेश भट नाट्यमंदिरात संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून १७०० जिल्हा परिषदेचे व स्थानिक स्वराज संस्थांचे शिक्षक, मुख्याध्यापक, प्रेरक, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून २० हजार शाळांचे शालेय स्तरावर मूल्यवर्धन कसे सुरू असून त्याचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग होतो, याचे २-२ मिनिटांचे व्हिडीओ प्राप्त झाले आहेत. यापैकी नागपूर जिल्ह्याचे ६८३ व्हिडीओ असून त्यापैकी १८ व्हिडीओ यावेळी मेळाव्यात दाखविण्यात आले.

 

शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी स्वत: शिक्षकांना मूल्यवर्धनबद्दल चर्चा करण्याची संधी दिली व सर्व शिक्षकांना चर्चेत सहभागी करून घेतले. शिक्षकांनी आपापल्या शालेत काय परिणाम दिसून येत आहेत, हे अतिशय चांगल्या पध्दतीने सांगितले. पहिल्या सत्रात श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शाळेतील बदलांविषयी बोलण्याची व दुस-या सत्रात काही ठोस सूचना करण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षकांनी १ ली ते ५ वी नंतर आता ६ वी ते १० वीपर्यंत मूल्यवर्धन लवकरात लवकर सुरू करावा, हा कार्यक्रम सक्तीचा करावा, हा कार्यक्रम खाजगी शाळांमध्येही सुरू करावा, यासाठी पालकांचे दरमहा शाळास्तरावर मेळावे घेण्यात यावेत अशा विविध सूचना केल्या.

 

 

श्री. रजनीश जैन , श्री. चिंतामण वंजारी(शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. नागपूर), श्रीमती हर्षलता बुराडे (DIET प्राचार्य ),श्रीमती प्रिती मिश्रीकोटकर (शिक्षणाधिकारी मनपा),सौ. शिला उदापुरकर, श्री. शांतीलाल मुथ्था, श्री. संजय यादव (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नागपूर), श्री. रविंद्र रमतकर (संचालक, विभागीय विद्या प्राधिकरण, नागपूर ), श्री. प्रफुल्ल पारख,

एकूणच नागपूर जिल्ह्यातील १७८८ शाळांमध्ये मूल्यवर्धन सुरू असून सर्वच शिक्षकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. सकाळी ९ पासून दुपारी २.३० वाजेपर्यंत एक मिनिटाचीही विश्रांती न घेता शिक्षकांनी स्वत:हून कार्यक्रम चालू ठेवण्याचा केलेला आग्रह म्हणजे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक करीत असलेली सुप्त क्रांतीच म्हणावी लागेल.

 

श्री. अनिश छाजेड, श्री. सावन भटेवरा, श्री. राजन धड्डा, श्री. राजे सुराणा, श्री. सतीश पेंढारी, श्री. गुलाबचंद छाजेड यांनी या मेळाव्यासाठी अनमोल सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 

श्री. प्रफुल्ल पारख यांनी आभार प्रदर्शन केले. जिल्हा समन्वयक श्री. रजणीश जैन यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या ३ महिन्यांपासून अविरत प्रयत्न केले.