जिल्हा मेळावा जालना: अहवाल

जालना जिल्हा मूल्यवर्धन मेळावा ८ जानेवारी २०२० : अहवाल

स्थळ : बीजेएस हॉल, साकलेचानगर, जालना
जि.प. शिक्षकांचा प्रचंड उत्साह हीच परिवर्तनाची नांदी

मूल्यवर्धनच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन :

 

जालना या छोट्या जिल्ह्यामधून शिक्षक व विद्यार्थ्यांनी 41 पोस्टर्स तयार करून मुख्य कार्यालयात पाठविली. याकामी उर्दू माध्यमाच्या शाळांचा सहभाग व उत्साह मोठ्या प्रमाणावर होता. पोस्टर्सच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन DIECPD प्राचार्य मा .श्री. राजेंद्र कांबळे यांच्या शुभहस्ते दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता जैन मराठी शाळा, जालना येथे संपन्न झाले.

 

या प्रसंगी शिक्षणाधिकारी मा.श्री. कैलासजी दातखिळे, गटशिक्षणाधिकारी श्री. एस. एन. कंडेलवार, श्री. विपुल भागवत, श्री. मदन आंधळे, श्री. विठोबा जायभाय, श्री. साबळे सर, अधिव्याख्याता डॉ. श्री. सतीश सातव, श्रीमती वैशाली जहागिरदार, श्री. राजेश चौधरी, श्री. सुनील वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी श्री. महाजन, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, ॲड. श्री. गौतमचंद संचेती, जालना जिल्हाप्रमुख  श्री. हस्तीमलजी बंब, श्री. अभय सेठिया व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

उद्घाटन प्रसंगी उजवीकडून मांटे सर (जेष्ट अधिव्याख्याता), डॉ.अभयजी सेठीया (एसएमएफ राज्य कार्यकारिणी), गौतमचंद संचेती (एसएमएफ जिल्हा प्रमुख औरंगाबाद), डॉ. राजेंद्र कांबळे (DIECPD), कैलास दातखीळ(शिक्षणाधिकारी), शांतिलालजी मुथ्था (एसएमएफ संस्थापक)

 

मूल्यवर्धन जिल्हा मेळावा :

 

जालना जिल्हा मूल्यवर्धन मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता बीजेएस हॉल, साकलेचानगर, जालना येथे करण्यात आले. यावेळी DIECPD प्राचार्य मा. श्री. राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी मा. श्री. कैलासजी दातखिळे, गटशिक्षणाधिकारी श्री. एस. एन. कंडेलवार, श्री. विपुल भागवत, श्री. मदन आंधळे, श्री. विठोबा जायभाय, श्री. साबळे सर, अधिव्याख्याता श्री. सतीश  सातव , श्रीमती वैशाली जहागिरदार, श्री. राजेश चौधरी, श्री. सुनील वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी श्री. महाजन, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, ॲड. श्री. गौतमचंद संचेती, बीजेएस जालना जिल्हाप्रमुख  श्री. हस्तीमलजी बंब, श्री. अभय सेठिया व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी चित्रफीत दाखवून श्री. शांतिलाल मुथ्था यांनी प्रास्ताविक केले. यानंतर बोलताना प्राचार्य मा. श्री. राजेंद्र कांबळे यांनी गेल्या चार वर्षांपासूनची मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयीची निरीक्षणे  सादर केली. चार वर्षांपूर्वी नंदुरबार येथील अतिग्रामीण भागात मूल्यवर्धनमुळे झालेले बदल त्यांनी स्वतः पाहिले असल्याचा अनुभव नमूद करून जालना जिल्ह्यात मूल्यवर्धन कार्यक्रम १०० टक्के यशस्वी करून नवीन पिढी घडवू असा आत्मविश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला. यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी मा. श्री. कैलास दातखिळे यांनी मूल्यवर्धन कार्याचा आढावा घेतला आणि मूल्यवर्धनमुळे फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही, तर शिक्षकांमध्येही बदल घडत असल्याची जालना जिल्ह्यातील उदाहरणे दिली. तसेच शिक्षकांचा प्रचंड उत्साह संपूर्ण शालेय विभागाला मजबूत करीत आहे, हेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक  (नोडल अधिकारी) डॉ. सतीश सातव यांनी आता मूल्यवर्धन प्रत्येक घरामध्ये पोहोचल्याचे व पालकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याचे आवर्जून सांगितले. इतकेच नव्हे तर उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनविषयी मोठ्या प्रमाणावर उत्साह असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळाभेटी करीत असताना सर्व ठिकाणी मूल्यवर्धनमुळे शाळांच्या वातावरणात बदल घडल्याचे आता दिसून येत असल्याचे सांगितले.

डावीकडून नरेंद्र जोगड (पत्रकार), अशोक संचेती (एसएमएफ जालना जिल्हाप्रमुख), शेखरचंद लोहाडी (एसएमएफ सदस्य), प्रकाश मांटे (जेष्ठ अधिव्यख्याता), कैलास दातखिळे (शिक्षणाधिकारी), सतीश सातव (जेष्ठ अधिव्यख्याता), शांतिलाल मुथ्था (एसएमएफ संस्थापक) डॉ. राजेंद्र कांबळे (DIECPD), हस्तीमल बंब (एसएमएफ राज्य अध्यक्ष), गौतम संचेती (एसएमएफ औरंगाबाद अध्यक्ष), अभय सेठिया (एसएमएफ राज्य सचिव), नरेंद्र मोदी (एसएमएफ सदस्य) आणि धनराज जैन एसएमएफ सदस्य)

 

शिक्षकांनी बनविलेल्या व्हिडिओ क्लिप्सचे सादरीकरण :

 

मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने ५०६ शिक्षकांनी मूल्यवर्धनमुळे झालेल्या परिवर्तनाविषयीच्या २-२ मिनिटांच्या व्हिडिओ क्लिप्स तयार करून पाठविल्या होत्या. यापैकी वेगवेगळ्या १८ क्लिप्सचे सादरीकरण जिल्हा मेळाव्यात करण्यात आले. प्रत्येक व्हिडिओ क्लिप एकापेक्षा एक सरस असल्याचे जाणवत होते. प्रत्येक क्लिपच्या वेळी सर्व शिक्षक टाळ्या वाजवून क्लिप बनविणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देत होते. यामध्ये उर्दू माध्यमाच्या शाळातील जवळपास ३क्लिप्स दाखविण्यात आल्या. त्यावेळी  सर्वच्या सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चर्चासत्र :

 

जालना जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षण ळे, गट शिक्षणाधिकारी श्री. एस.विस्तार अधिकारी यांनी मंचावर येऊन चर्चासत्रास सुरुवात केली. या चर्चासत्रामध्ये DIECPD प्राचार्य मा. श्री. राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी श्री. कैलासजी दातखिएन. कंडेलवार, श्री. विपुल भागवत, श्री. मदन आंधळे, श्री. विठोबा जायभाय, श्री. साबळे सर, अधिव्याख्याता श्री.डॉ सतिश सातव, श्रीमती वैशाली जहागिरदार, श्री. राजेश चौधरी, श्री. सुनील वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी श्री. महाजन, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राच्या वेळी श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शिक्षकांच्या गटागटात सहभागी होऊन शिक्षकांचे विचार आणि अनुभव यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक गटात जास्तीतजास्त शिक्षक आपणहून बोलण्याची इच्छा व्यक्त करीत होते. याचे कारण प्रत्येकाकडे मूल्यवर्धनबद्दल सांगण्यासारखे भरपूर काही होते. जवळजवळ २० शिक्षकांनी त्यांची मते मांडली, अनुभव व्यक्त केले व त्यांच्या शाळेत घडणाऱ्या घटना विस्तृतपणे सांगितल्या. संपूर्ण सभागृहामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण झाल्याचे सर्वांनाच जाणवत होते. उर्दू शाळांच्या काही शिक्षिकांनी त्यांचे अनुभव सांगितले, तेव्हा संपूर्ण सभागृहाने त्यांना मोठा प्रतिसाद दिला. जालना जिल्ह्याच्या सर्व ८ तालुक्यांमध्ये ४२६१ शिक्षकांनी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले आहे व १,१८,००० विद्यार्थी वर्गामध्ये मूल्यवर्धनच्या उपक्रमांमध्ये मुक्तपणे सहभागी होऊन आनंद घेत आहेत.

श्री. कैलास दातखीळ (EO)

श्री. डॉ.राजेंद्र कांबळे (DIET प्रचार्य)

श्री. मांटे सर (जेष्ट अधिव्याख्याता)

श्री. सतीश सातव (जेष्ठ अधिव्यख्याता)

 

शिक्षकांचा सन्मान :

 

ज्या-ज्या शिक्षकांनी व्हिडीओ बनवले आहेत अशा शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते ‘मी आणि मूल्यवर्धन’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यामुळे सर्व शिक्षकांचा उत्साह द्विगुणीत झाला व अनेकांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाबाबत अधिक जबाबदारी स्वीकारण्याचा मनोदय व्यक्त केला. प्रत्येक शिक्षकाने या कार्यक्रमाच्या सुखद आठवणी सदैव स्मरणात राहाव्यात, यासाठी आळीपाळीने सर्व मान्यवरांबरोबर फोटोही काढले. खास करून उर्दू माध्यमाच्या सर्व मास्टर ट्रेनर्सनी श्री. शांतिलाल मुथ्था यांच्यासमवेत फोटो काढून मूल्यवर्धनबद्दल चर्चा केली. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे शिक्षक, प्रेरक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख असे एकूण ३१५ लोक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक दहेकर यांनी केले. श्री. अभयजी सेठिया यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप झाला.

 

 

कार्यक्रम संपल्यानंतर प्रदर्शनाच्या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक पत्रकारांनी मूल्यवर्धनबद्दल प्रश्न विचारले. यावेळी DIECPD प्राचार्य मा.श्री. राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी मा. श्री. कैलासजी दातखिळे, अधिव्याख्याता डॉ. श्री. सतीश सातव, श्री. शांतिलाल मुथ्था, ॲड. गौतमचंद संचेती, श्री. हस्तीमलजी बंब हे उपस्थित होते.

 मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये  :

 

  • उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आला.
  • DIECPD प्राचार्य मा. श्री. राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी मा. श्री. कैलास दातखिळे, अधिव्याख्याता, डॉ. श्री. सतीश सातव, सर्व अधिकारी सकाळपासून पत्रकारपरिषद संपेपर्यंत उपस्थित होते.
  • मूल्यवर्धनबद्दल आपले विचार व्यक्त करण्याविषयीची उत्सुकता सर्वच शिक्षकांमध्ये असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.
  • सर्वच उपस्थित शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
  • शिक्षकांचे विचार ऐकताना संपूर्ण सभागृहामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण झाल्याचे सर्वांना जाणवले.
  • एसएमएफच्या सर्व टीम्सनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • एसएमएफचे प्रशिक्षक आणि तालुका समन्वयक यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
जि.प. शिक्षकांचा या मेळाव्यात  दिसून आलेला प्रचंड उत्साह
ही शालेय शिक्षणामधील परिवर्तनाची नांदी ठरू शकेल असा विश्वास वाटतो.