मूल्यवर्धन अनुभव कथन
मुलांमध्ये मूल्य रुजविण्याचे कार्य शाळेमध्ये आधीही परिपाठ, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून होतच होते. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे याला योग्य दिशा मिळाली. माझ्यापासून सुरुवात करून जगापर्यंत कसे जावे, याचा क्रम समजला. सहयोगी खेळ, जोडीचर्चा, सामुदायिक वर्तुळ या आनंददायी माध्यमातून अभ्यासक्रमापेक्षा वेगळे काही असल्याने मुले आनंदाने सहभागी होऊ लागली. मूल्यवर्धन तासिकेची वाट पाहू लागली. वर्गरचना, वर्गनियंत्रण व स्वयंशिस्त लागण्यासाठी मदत झाली. शांतता संकेत तर खूप प्रभावी आहे. मुलांना विचार करायला, नवीन शोधायला, वेगळे काही करायला यातून चालना मिळाली. मूल्ये म्हणजे काय, त्यांचा जीवनात उपयोग याची जाणीव मुलांना झाली. प्रत्यक्ष कृतीमुळे मुले आनंदी झाली.
-सुहास मुरलीधर पाटील