जिल्हा मेळावा – लातूर अहवाल

लातूर जिल्हा मूल्यवर्धन मेळावा १४ जानेवारी २०२० : अहवाल

स्थळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत  (DPDC HALL), जिल्हा परिषद, लातूर
“व्यक्तीने समाजाचे नाही, तर सामाजिक व्हावं”

व्यक्ती विशिष्ट समाजात जन्म घेते, तेव्हा ती फक्त त्या समाजाची असते,

पण किमान आयुष्याच्या अखेरपर्यंत तरी व्यक्तीने त्या विशिष्ट समाजाचे नाही,

तर सामाजिक व्यक्ती व्हावे,हेच आयुष्याचे फलित असते.”

जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत

“व्यक्तीने आपली ओळख म्हणजे ज्या समाजाचे जन्म झाला, त्या समजाचे म्हणून नाही, तर विशाल दृष्टिकोन ठेवून समाजशील व्हावे.” मंगळवार, दिनांक १४ जानेवारी 2020 रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, लातूर येथे संपन्न झालेल्या मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत बोलत होते.

 

शिक्षण घेऊन व्यक्ती मोठी अधिकारी, डॉक्टर, अभियंता होईल, पण तिच्यात मूल्ये नसतील तर व्यक्ती म्हणून कधीच घडणार नाही. व्यक्ती म्हणून घडविण्याचे कार्य मूल्यवर्धन करते अशा शब्दांत जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांनी मूल्यवर्धन उपक्रमाचे कौतुक केले.

प्रभातफेरी निघाली

 

मंगळवार, दिनांक १४ जानेवारी 2020 रोजी लातूर शहरातील मनपा शाळा क्र. ९ पासून राजस्थान मारवाडी हायस्कूलमागील मैदानापर्यंत, सकारात्मक संदेशांचे फलक हाती घेऊन, संवैधानिक मूल्यांच्या घोषणा देत प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी निघाली.

राज्यभरातील मूल्यवर्धन शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सकारात्मक संदेश देणाऱ्या पोस्टर्स प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रभातफेरीची सांगता झाली.

त्यानंतर प्रदर्शनस्थळी विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका सादर केल्या.

उपस्थित मान्यवरांनी मूल्यवर्धन शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

उदघाटनप्रसंगी डावीकडून श्री. डॉ. विपीन ईटनकर (मुख्य कार्यकारी अधिकारी), श्री शांतीलाल मुथ्था सर आणि श्री. सुनिल कोचेटा (जिल्हाप्रमुख, लातूर)

प्रदर्शनाचे उद्घाटन

 

सुंदर, सामाजिक, भावनिक संदेश देणाऱ्या भित्तीपत्रकांचे अद्भुत प्रदर्शन राजस्थान हायस्कूलमागील मैदानात भरविले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रभात फेरीतील दोन शालेय विद्यार्थिनींना बोलावून व त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

या उद्घाटन प्रसंगी मा. श्री. बी. जी. चौरे (DIECPD चे प्राचार्य, मुरूड, लातूर), सी. ए. श्री. सुनील कोचेटा (एसएमएफ जिल्हाप्रमुख, लातूर), श्री. अभय शहा (मूल्यवर्धन समन्वयक) व मा. श्री. शांतिलाल मुथ्था (संस्थापक, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे) उपस्थित होते.

मेळाव्याचे उद्घाटन :

 

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (DPDC HALL), जिल्हा परिषद, लातूर येथे मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याला सुरुवात झाली.

मा. श्री. जी. श्रीकांत (जिल्हाधिकारी, लातूर ), मा. श्री. चौरे बी. जी. (DIECPD प्राचार्य मुरूड, लातूर ), श्रीमती डॉ. वैशाली जामदार (जि. प. शिक्षणाधिकारी- प्राथमिक ), श्री. विशाल दशवंत (जि. प. उपशिक्षणाधिकारी- प्राथमिक),  मा. श्री. मुकुंद दहिफळे (अधिव्याख्याता DIECPD मुरुड, लातूर), मा. श्री. डी. एच. सोनफुले (शिक्षणाधिकारी म.न.पा.), सी.ए. श्री. सुनील कोचेटा (एसएमएफ जिल्हाप्रमुख, लातूर) या व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

डावीकडून श्री.डी.एच. सोनफुले (शिक्षणाधिकारी, मनपा), –  (श्री. विजयकुमार ) सायगुंडे (अधिव्याख्याता DIECPD), श्री.बी.जी. चौरे (DIECPD प्राचार्य), श्री. शांतिलाल मुथ्था, श्री.व्ही. व्ही. दशवंतसिंग (उपशिक्षणाधिकारी), श्री. अभय शहा (जिल्हाप्रमुख), श्री.सुनिल कोचेटा (जिल्हाप्रमुख)

 

प्रास्ताविक :

 

एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मूल्यवर्धन या शैक्षणिक क्रांतिकारी कार्यक्रमाचे महत्त्व सांगून आजच्या काळातील त्याची गरज नमूद केली.

मान्यवरांचे मनोगत :

 

सर्व मान्यवरांचा सत्कार झाल्यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मा. जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांनी आपल्या विनोदीशैलीत मनोगत व्यक्त करताना उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी आजच्या काळात मूल्यवर्धन कार्यक्रम हा अत्यंत गरजेचा असून, फक्त पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन योग्य नागरिक बनविणारा पाया आहे, असे सांगितले.

 

प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वैशाली जामदार यांनी मूल्यवर्धनचे कौतुक करत मुलांनी खेळांमध्येही सहभाग घ्यावा, असे सांगितले.

व्हिडिओ क्लिप्सचे सादरीकरण :

 

लातूर जिल्ह्यातून मूल्यवर्धन संबंधित शिक्षकांनी व मुलांनी मिळून तयार केलेल्या एकूण ६१० व्हिडीओ क्लिप्सचे संकलन करण्यात आले, त्यापैकी निवडक २० व्हिडीओ क्लिप्स मेळाव्यात दाखविण्यात आल्या

चर्चासत्र :

 

मूल्यवर्धन उपक्रमांचा परिणाम कशाप्रकारे होत आहे, हे या चर्चासत्रातून स्पष्ट करण्यात आले. श्री. शांतिलाल मुथ्था यांनी सभागृहातील शिक्षकांकडे जाऊन त्यांच्या भावना, प्रतिक्रिया व अपेक्षा तसेच मूल्यवर्धनबद्दलचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याची संधी त्यांना दिली. ज्या शिक्षकांना ही संधी मिळाली, त्यांनी मूल्यवर्धन ही शिक्षणातील एक नवी क्रांती आहे, उपक्रमांमुळे मुलांमध्ये मूल्ये रुजवून त्यांना सुजाण नागरिक बनविण्याचा प्रयत्न होतो, अशाप्रकारे कौतुक केले.

चर्चेत अनेक शिक्षकांनी मूल्यवर्धन संबंधित हृदयस्पर्शी अनुभव कथन केले.

सूत्रसंचालन :

 

लातूर जिल्हा मेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक सौताडेकर (नोडल ऑफिसर जि. प. लातूर)  यांनी केले.

आभार प्रदर्शन :

 

मा. श्री. योगेश सुरवसे ( डायट अधिव्याख्याता, मुरुड, लातूर) यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये

 

  • राज्यभरातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यवर्धनवर आधारित शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे दृश्य चित्रच या भव्य प्रदर्शनातील भित्तीपत्रके संपूर्ण लातूर जिल्ह्यातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.
  • सर्वच उपस्थित शिक्षकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसून होता.
  • श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शिक्षकांनाही बोलण्याची संधी दिली. सर्वच शिक्षकांनी मूल्यवर्धनचा प्रभाव, आवश्यकता व महत्त्व पटवून दिले.
  • लातूर शहरातील सर्व पत्रकार बंधूंना प्रदर्शनाच्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विविध प्रश्न विचारून या संपूर्ण कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • एसएमएफच्या सर्व टीमने हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • मूल्यवर्धनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारत देशाचे कर्तव्यशील, जबाबदार नागरिक बनविण्याचा सर्व शिक्षकांनी निर्धार केला.