प्रा. श्री. गोविंदा यांची शांतिलाल मुथ्था फाउंडेशनला भेट

शांतिलाल मुथ्था फाउंडेशनमध्ये (डावीकडून) फाउंडेशनचे सीओओ श्री. व्ही. व्यंकटरमणा, फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे सन्माननीय सदस्य प्रा. श्री. गोविंदा आणि फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था.

शांतिलाल मुथ्था फाउंडेशनमध्ये (डावीकडून) फाउंडेशनचे सीओओ श्री. व्ही. व्यंकटरमणा, फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे सन्माननीय सदस्य प्रा. श्री. गोविंदा आणि फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था.

शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या (एसएमएफ) संचालक मंडळाचे सन्माननीय सदस्य आणि एनयूईपीएचे माजी कुलगुरू प्रा. श्री. गोविंदा यांनी दि. २६ व दि. २७ जानेवारी २०१८ रोजी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या पुणे कार्यालयास भेट दिली.

या वेळी त्यांनी एसएमएफच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली. मूल्यवर्धन कार्यक्रमाची आणि त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. गेल्या काही वर्षांत शाळा या संकल्पनेचे बदललेले स्वरूप यावर विस्तृत विवेचन केले. शालेय शिक्षणातील व्यापक दृष्टिकोन स्पष्ट करुन त्यांनी मौलिक मार्गदर्शनसुद्धा केले.