मुलांनी बनविले वृत्तपत्रांच्या कात्रणातून संदर्भ पुस्तक

वृत्तपत्रांची कात्रणे जमा करून एका शाळेतील मुलांनी संदर्भ पुस्तिके बनविली. त्यांच्या मनात हा विचार मूल्यवर्धन तासिकांमुळे आला.

मूल्यवर्धन उपक्रमाचा आधार घेऊन एका शाळेतील मुलांनी दररोजच्या वर्तमानपत्रांतील कात्रणे कापून वेगवेगळ्या विषयांवर सुमारे शंभर पानांची पाच संदर्भ पुस्तके तयार केली आहेत.  

शाळेतील शिक्षिका विद्या वालोकर सांगतात, “मूल्यवर्धन मधील काही उपक्रम हे मुलांना पर्यावरणाबद्दल संवेदनशील बनविण्याशी संबंधित आहेत. उपक्रम टाकाऊ गोष्टींचा पुनर्वापर करण्याशी संबंधित आहेत. काही उपक्रम वस्तूंची बचत आणि त्यांच्या योग्य वापरास प्रोत्साहन देतात. त्याचप्रमाणे मूल्यवर्धनात उपक्रम असा आहे जो रद्दी कागदाच्या वापरावर आधारित आहे. उपक्रमाच्या आधारे, आमच्या शाळेतील मुलांनी दररोजची वर्तमानपत्रे वापरली आहेत आणि पुस्तके तयार केली आहेत. एक वर्षात त्यांनी हे कार्य पूर्ण केले आहे. यासाठी त्यांनी पाच वेगवेगळ्या गटांमध्ये काम केले आणि अशा प्रकारे त्यांनी वर्तमानपत्र कच-याच्या टोपलीत ण्यापासून केवळ रोखलेच नाही तर कात्रणांचा योग्य वापर करून संदर्भ पुस्तके बनविली आणि शालेय ग्रंथालय देखील समृद्ध केले.

ही शाळा आहे वर्धा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा-वेळा. वर्धा जिल्ह्याच्या ठिकाणापासून 35 कि.मी. अंतरावर असलेल्या तहसील हिंगणघाट अंतर्गत या शाळेत मूल्यवर्धनची सत्रे ऑगस्ट २०१७ पासून घेण्यात येत आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मुख्याध्यापकांसह एकूण 4 शिक्षक आणि 35  मुले आहेत. गावात प्रामुख्याने लहान व मध्यम शेतकरी कुटुंबे राहतात.

 

वृत्तपत्राच्या माध्यमातून मूल्यवर्धन तासिकेचे आयोजन करताना शिक्षिका विद्या वालोकर

वृत्तपत्राच्या माध्यमातून मूल्यवर्धन तासिकेचे आयोजन करताना शिक्षिका विद्या वालोकर

ही एक उपलब्धी का आहे

मूल्यवर्धन शिक्षिका विद्या वलोकर या शाळेतील ही एक मोठी उपलब्धी मानतात. त्यांचे म्हणणे आहे की मुलांनी मूल्यवर्धन सत्रातून प्रेरित होऊन भूगोल, विज्ञान, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयांवर पुस्तके तयार केली आहेत. याशिवाय काही कात्रणावरून महात्मा गांधींचे जीवन चरित्रही तयार केले आहे. याचा एक फायदा असा आहे की म्हणजे मूल्यवर्धन किंवा इतर कोणत्याही विषयाच्या सत्रामध्ये मुलांना अभ्यासाच्या वेळी संदर्भ पुस्तकांची गरज असल्याचे वाटत असल्यास त्यांनी त्यांची माहिती वर्गात मिळते.

याशिवाय अशा कामांमुळे मुलांमध्ये संकलनाची वृत्ती वाढत आहे. ते ज्ञान, कुतूहल, निरीक्षण आणि स्वयंअध्ययन या मुद्यांविषयी जागरूक होत आहेत. तसेच, या संदर्भ सामग्रीचा सामाजिक वापर होत आहे.

याबद्दल विचार का केला?

विद्या वालोकर सांगतात की शाळेतल्या मुलांनी पुष्कळदा कागदाचा योग्य वापर न करता फाडणे आणि फेकणे याकडे दुर्लक्ष केले आहे. तथापि, मूल्यवर्धन सत्रात जेव्हा त्यांनी रद्दी कागदाच्या योग्य वापराविषयी संबंधित एखादा उपक्रम आयोजित केला तेव्हा त्यांना वाटले की या संदर्भात मुलांसमवेत प्रकल्प करता येईल.

त्या म्हणाल्या, “सप्टेंबर २०१८ मध्ये, मूल्यवर्धन सत्रादरम्यान, मी मुलांना पेपर कसा तयार होतो ते सांगितले. यासाठी, मी माझ्या मोबाइलवर YouTube वर काही व्हिडिओ देखील मुलांना दाखविले. त्यानंतर, मी मुले पेपरचा वापर कसा करतात हे 15-20 दिवस पहिले. माझ्या लक्षात आले की अनावश्यक कागद फाडू नये हे मुलांना कळले आहे.”

यानंतर विद्या वालोकर मुलांशी बोलल्या आणि कागदाचा चुकीचा वापर कसा रोखता येईल हे जाणून घेतले.  मुले म्हणाली की रद्दी कागदापासून काही चांगल्या गोष्टी बनवता येतात. सुरुवातीला एका मुलाने जुन्या वर्तमानपत्रांचा मुखवटा तयार केला. त्याचप्रमाणे मुलाने कागदाची टोपी बनविली. दरम्यान, काही मुलांनी सांगितले की ते वृत्तपत्रांतून प्रकाशित होणा-या माहितीविषयक लेखांची कात्रणे कापून पेस्ट करू शकतात.

 

अतिरिक्त वेळेत वृत्तपत्राच्या कात्रणांतून मुले अशी संदर्भ पुस्तके तयार करतात

अतिरिक्त वेळेत वृत्तपत्राच्या कात्रणांतून मुले अशी संदर्भ पुस्तके तयार करतात

असा साकार झाला प्रकल्प

विद्या वालोकर म्हणतात, “मला ही कल्पना आवडली, कारण इतर मूल्यवर्धन उपक्रमांशी ती जोडली जाऊ शकते आणि इतर अनेक सत्रांत माहितीची आदानप्रदान करण्यासाठी या लेखांचा उपयोग केला जाऊ शकतो.”

अशाप्रकारे, मूल्यवर्धन शिक्षकाने आणि मुलांनी एकत्रितपणे संदर्भ पुस्तकांची योजना विकसित केली. यानंतर, मुले नियमितपणे आणि काळजीपूर्वक शाळेत येणारी वर्तमानपत्रे वाचू लागली. याचा परिणाम असा झाला की त्यांनाही बातमीची जाणीव झाली.

सुरुवात कठीण होती

सुरुवातीला वृत्तपत्रात कोणती माहिती कोणत्या विषयाखाली येईल हे मुलांना समजू शकले नाही. मग ते शिक्षकाचे मार्गदर्शन घेत असत. विद्या वालोकर सांगतात, ‘एखाद्या प्रकारची शंका असल्यास आम्ही एकत्रित चर्चा करायचो. यामुळे मुलांचा विचार स्पष्ट झाला. आज मुले आणि शिक्षक संदर्भ पुस्तके वापरतात. गावातील शेतकरीही शालेय ग्रंथालयात शेतीशी संबंधित काही माहिती मिळवतात.”