एसएमएफ विषयी

शांतिलाल मुथ्था फाउंडेशनमध्ये आपले स्वागत!

शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) ही शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात मूलभूत बदल आणण्यासाठी जेष्ठ समाजसेवक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी उभारलेली संस्था आहे. भारताच्या सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधारित शिक्षण मिळावे या उद्देशाने एसएमएफ कार्य करीत आहे.

 

संस्थेचे स्वरूप

एसएमएफ ही संस्था ‘कंपनी अ‍ॅक्ट’ अंतर्गत ‘नॉट फॉर प्रॉफिट’ संस्था म्हणून नोंदणीकृत आहे.

 

एसएमएफच्या माध्यमातून सध्या दोन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

rsz_mulyavardhan-logo-1
SESQ_Logo-300x120

संचालक मंडळ

श्री. शांतिलाल मुथ्था

डॉ. एम. पी. विजयकुमार

प्रा. आर. गोविंदा

श्री. विवेक सावंत

श्री. श्याम मेनन

श्री. वल्लभ भन्साळी

प्रा. डॉ. एस. परशुरामन

श्री. समीर मुथ्था

टीम :-
शैक्षणिक प्रशिक्षण, शैक्षणिक साधनांची निर्मिती, प्रोग्राम व्यवस्थापन, प्रोग्राम निरिक्षण आणि मूल्यांकन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया अशा अनेक क्षेत्रातील उत्तम आणि अनुभवी व्यावसायिक एस.एम.एफ.मध्ये काम करीत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रातील काही सन्मानित व्यक्ती आणि निवृत्त शिक्षण अधिकारी एस.एम.एफ.बरोबर सल्लागारांच्या रुपात काम करीत आहेत.