मुलांनी बनविले स्वतःचे वाचनालय

मूल्यवर्धनमधील विद्यार्थी उपक्रम पुस्तिकांमधून प्रेरणा घेऊन एका शाळेतील मुलांनी आपले वाचनालय तयार केले.

एका शाळेत मूल्यवर्धन उपक्रमांमुळे मुले पुस्तकांकडे अशाप्रकारे आकर्षित होत आहेत की त्यांनी स्वतः आपले वाचनालय तयार तयार केले आणि ते एकमेकांच्या सहकार्याने ते वाचनालय चालवित आहेत.

वर्धा जिल्ह्यापासून 65 कि.मी. अंतरावर हिंगणघाट तहसील अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा-शेकापूर येथे हे अनुभवायला मिळाले. तेथे  ऑगस्ट 2018 पासून मूल्यवर्धन सत्रे आयोजित केली जातात. मुख्याध्यापकांसह या शाळेत एकूण 4 शिक्षक आणि 112 मुले आहेत. जवळपास 4 हजार लोकसंख्या असलेल्या शेकापूर गावात बहुतेक कामगार आणि लहान शेतकरी यांची कुटुंबे राहतात.

 

वृत्तपत्राच्या माध्यमातून मूल्यवर्धन तासिकेचे आयोजन करताना शिक्षिका विद्या वालोकर

मूल्यवर्धनमधून प्रेरणा घेऊन मुले वाचनालयात पुस्तकांच्या वाचनाबरोबर अभ्यास आणि खेळदेखील गटाने करतात.

शी निर्माण झाली पुस्तकांविषयी आवड

मूल्यवर्धन शिक्षक व्ही.बी. नखले म्हणाले की शाळेत दीड वर्षापासून मूल्यवर्धन उपक्रम सतत राबविले जातात. त्यांचा असा परिणाम होत आहे की बहुतेक मुले पुस्तकांकडे आकर्षित होत आहेत.

या आकर्षणामागील त्यांचा अनुभव असा आहे की, मूल्यवर्धन पुस्तकांमुळे मुलांमध्ये इतर पुस्तकांविषयी आवड निर्माण झाली. मूल्यवर्धन पुस्तकातील कोणत्याही कविता किंवा गाण्याचे वाचन/गायन करण्याऐवजी उपक्रमाच्या मध्यमातून वाचतात. यामुळे मूल्यवर्धन पुस्तकांशी त्यांचे आकर्षण वाढते. त्यानंतर ते इतर पुस्तकांमध्ये तत्सम कविता किंवा कथा शोधण्याचा प्रयत्न करतात. व्ही. बी. नाखेल स्पष्ट करतात, “उदाहरणार्थ, मूल्यवर्धन पुस्तकात समानता किंवा मैत्रीविषयी एखादी कथा मुलांना आवडली तर मुले या विषयांशी संबंधित कथा असलेली इतर पुस्तके वाचायला आवडीने घेतात. चांगली गोष्ट म्हणजे अशी पुस्तके मुले एकट्याने वाचण्याऐवजी समूहामध्ये वाचतात. या सवयी त्यांच्यात मूल्यवर्धन उपक्रमांतून आली आहे. मुलांच्या सामुहिक वाचनामुळे मनात ही कल्पना आली की सर्व मुलांनी एकत्र येऊन एक वाचनालय तयार करावे.”

वाचनालयाचे फायदे

या शाळेतील मुलांनी गेल्या एक वर्षात त्यांच्या वाचनालयात 400 हून अधिक पुस्तके संग्रहित केली आहेत. यातील बहुतेक पुस्तके मराठी भाषेशी संबंधित आहेत. कविता, कथा, चित्र आणि उत्तम व्यक्तिमत्वांव्यतिरिक्त विज्ञान आणि इतिहासाशी संबंधित काही पुस्तके आहेत. वाचनालयातील पुस्तकांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीपेक्षा वाचण्यासाठी अधिक पुस्तके उपलब्ध आहेत आणि म्हणूनच ते पूर्वीपेक्षा अधिक आवडीने त्यांचा लाभ घेत आहेत.

मुले पुस्तके कशी गोळा करतात

याबद्दल व्ही. बी. नखले सांगतात की एखाद्या मुलाचा वाढदिवस शाळेत साजरा केला गेला, तर शाळेतली इतर मुले भेटवस्तू म्हणून पुस्तक देतात. त्याचप्रमाणे अनेक पुस्तके शिक्षकांना उपलब्ध करुन दिली. त्याचबरोबर, काही  पुस्तके मुलांच्या कुटूंबांकडून तर काही गावातील व्यक्तींकडून देखील प्राप्त झाली आहेत.

पुस्तक गहाळ होऊ नये म्हणून मुलांनी प्रत्येक पुस्तकाच्या मुख्य मुखपृष्ठावर त्याचा नंबर लिहिला आहे आणि वाचनालयासाठी तयार केलेल्या फाईलमधील क्रमांकासह त्याचे वर्णन दिले आहे. ही जबाबदारी इयत्ता चौथीची मुले सांभाळतात.

वाचनासाठी निश्चित वेळ

वाचनालयासाठी शालेय मुलांनी हा नियम बनविला आहे की कोणीही मुल पुस्तक वाचण्यासाठी घरी घेऊन जाणार नाही. याचे कारण असे आहे की वाचनालयातील बहुतेक पुस्तकांची एकच प्रत असते. अशा परिस्थितीत जर इतर मुलांना किंवा शिक्षकांना पुस्तक वाचायचे असेल तर ते त्यांच्यासाठी सहज उपलब्ध असावे.

तसेच, जर एखाद्या मुलाला वाचनालयात एखादे पुस्तक वाचायचे असेल तर त्यासाठी वेळ निश्चित केलेला आहे. प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळा वेळ निश्चित केला आहे. उदाहरणार्थ, दुसरी इयत्तेतील मुले दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान वाचनालयाचा लाभ घेऊ शकतात. तथापि, एखाद्या मुलास विशेष परिस्थितीत एखादे पुस्तक वाचायचे असेल तर त्याला आपल्या वर्गशिक्षकांची परवानगी घ्यावी लागते.

निम्म्याहून अधिक मुले याचा फायदा घेत आहेत

व्ही. बी. नखले यांच्या म्हणण्यानुसार, दरमहा सरासरी 60 ते 70 मुले वाचनालयाचा लाभ घेत आहेत. त्यांच्यात वाचनाची प्रगती होत आहे आणि ते पूर्वीपेक्षा जास्त वेगाने अधिक शुद्ध उच्चाराने वाचू शकतात.

व्ही. बी. नखले यांनी शालेय मुलांसाठी वाचनालय केंद्रस्थानी ठेऊन इतर अनेक उपक्रम तयार केले आहेत. उदाहरणार्थ, ते परिपाठामध्ये दररोज 20-मिनिटांचे सत्र आयोजित करतात, ज्यामध्ये मुले मूल्यवर्धन किंवा वाचनालयातून वाचलेल्या एखाद्या कथेबद्दल त्यांचे अनुभव सांगतात. यामुळे वाचनालयातील पुस्तकांचे इतर मुलांमध्ये आकर्षण वाढत आहे.

अनेक वेळा मुले कोणत्याही विषयावर आपले अनुभव सांगण्यासाठी जोडी किंवा गटाने सादरीकरण करतात. हे त्यांनी मूल्यवर्धनमध्ये आयोजित केलेल्या उपक्रमांत शिकले आहे. सामान्यत: ते स्वच्छता, प्रामाणिकपणा, वृक्षारोपण, शिस्त यासारख्या विषयांवर आपले अनुभव सांगतात.

शिक्षक व्ही. बी. नखले म्हणतात की मूल्यवर्धनमुळे मुलांनी जे काही मिळविले आहे त्यामुळे मुले पहिल्यापेक्षा अधिक शिष्ट झाली आहेत. शेवटी ते म्हणतात, “आमच्या मुलांच्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे हे सिद्ध झाले की शिक्षणामुळे नम्रता विकसित होते.”