श्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार नोव्हेंबर महिन्यात प्रदान करण्यात आला. महामहीम राष्ट्रपती मा. श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकरताना शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था.

पुणे: शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांना यंदाचा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

बालदिनाचे औचित्य साधून दि. १४ नोव्हेंबर २०१७  रोजी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रायलातर्फे नवी दिल्लीत आयोजित खास सोहळ्यात श्री. मुथ्था यांना सन्मानित करण्यात आले. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १०,००० शाळा, ५०,००० शिक्षक आणि १०,०००० विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन हा कार्यक्रम राबवला जात आहे. गोव्यातही सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये मूल्यवर्धन राबवले जाते.

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या तसेच ग्रामीण भागातील चार हजारावर मुलांचे शिक्षण, आहार व निवासाची व्यवस्था करुन त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या, त्याचप्रमाणे स्मार्टगर्ल्स या उपक्रमाअंतर्गत ७३,६२५ मुलींचे शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने सक्षमीकरण केले आहे.

 

Leave a Message