व्हिडीओ गॅलरी

मुलांनी गाव केले व्यसनमुक्त

मूल्यवर्धन मधील उपक्रमांतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी गाव व्यसनमुक्त केले. यासाठी या लहानग्यांनी प्रसंगी अन्नत्याग देखील केला. लहानग्यांच्या हट्टापुढे झुकून सर्व गाव पूर्णपणे व्यसनमुक्त झाले.

सर्व विद्यार्थी मिळून पर्यावरण रक्षणासाठी शाळेमध्ये बाग तयार करून ती जतन करतात

पर्यावरण शिक्षण, श्रम प्रतिष्ठा या गोष्टी फक्त पुस्तकात न राहता मुलं शाळेतील बाग फुलवताना या गोष्टींचे प्रत्यक्ष शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थी शाळेत वेळेवर येत नाहीत ह्या समस्येवर मात करणाऱ्या जि. प. शिक्षिका

विद्यार्थी शाळेत वेळेवर येत नाहीत ही एक मोठी समस्या कोल्हापूर शहरातील भाऊराव पाटील विद्यामंदिर या शाळेतील शिक्षकांसमोर होती. मूल्यवर्धन कार्यक्रमातील एका उपक्रमांतर्गत वर्ग नियम बनवताना विद्यार्थ्यांनी शाळेत वेळेवर येण्यासंबंधी नियम बनवला आणि हे चित्र पालटले.

शिक्षक कार्यशाळा

मूल्यवर्धन संदर्भात सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. मूल्यवर्धन उपक्रमांचा सराव, साहित्यासह जोडी चर्चा यामुळे प्रभावी ठरलेल्या या कार्यशाळेनंतर मूल्यवर्धन उपक्रमाविषयी शिक्षकांनी नोंदवलेली मते…

मूल्यवर्धन गीत 

आता गिरवू एकच कित्ता… ध्यास आमचा गुणवत्ता..’ हे शब्द आहेत मूल्यवर्धनने प्रेरित शिक्षकांचे!.. पुण्यातील भोर तालुक्यातील नाटम्बी केंद्रातील करंजे शाळेतील परिवर्तनाची ही कहानी.

विद्यार्थ्यांशी  थेट भेट

मूल्यवर्धन आढावा बैठकीनिमित्त शांतिलाल मुथ्था फाउंडेशनेचे अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांनी महाराष्ट्रातील अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशिल अशा गडचिरोली जिल्ह्यात दि. २२ व २३ डिसेंबर २०१६ रोजी भेट दिली.

उर्दू माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने मुख्याध्यापक आश्चर्यचकित

मूल्यवर्धन कार्यक्रम महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळांबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये देखील राबविला जात आहे. अशाच एका उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांचे मूल्यवर्धन विषयीचे मत जाणून घेऊया.

मूल्यवर्धन – संकल्पना गीत

*आले आले मूल्यवर्धन – मूल्यवर्धन कार्यक्रमाचे संकल्पना गीत* प्रस्तुतकर्ते – शांतिलाल मुथ्था फाउंडेशन संगीत – आदी रामचंद्र

बंद होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जि.प.शाळेतील शिक्षकांच्या परिश्रमामुळे तीन वर्षात पटसंख्या तीप्पट

मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे रेठरेहरनाक्ष येथील शाळेची पट संख्या मात्र तिप्पट वाढली आहे.

उपक्रमामुळे शेतमजुराच्या मुलामध्ये शाळेत जाण्याची आवड निर्माण होऊन तो शाळेत जाऊ लागला

मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. ही गोष्ट आहे माझेरी गावातील रोहन पवार या विद्यार्थ्याची. शाळा सुरु झाल्यावर रोहन शाळेत बसत नसे, आईला किंवा आजोबांना त्याच्यासाठी शाळेबाहेर बसून राहावे लागे, नवीन विद्यार्थ्यांशी ओळख आणि मैत्री करायला तो उत्सुक नव्हता. परंतु माझेरी येथील शाळेतील प्रसन्न आणि बलास्नेही वातावरणामुळे आणि मूल्यवर्धन उपक्रमांमुळे लवकरच हे चित्र पालटले. हाच रोहन नंतर आई आणि आजोबांना तुम्हाला काम असेल तुम्ही घरी जा असे स्वतः बजावू लागला आणि स्वतः आनंदाने शाळेत बसू लागला.

गोव्यात मूल्यवर्धन : गोव्यातील शेकडो शाळांमध्ये मूल्यवर्धन मुळे परिवर्तन

२०१६ मध्ये गोवा राज्यात मूल्यवर्धनची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून, शाळा, मुले आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये अमुलाग्र बदल झालेले दिसून आले. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केलेल्या मूलभूत मूल्यांच्या आधारे, मूल्यवर्धनचे उद्दिष्ट गोव्यातील १२ तालुक्यांमधील ७८१ प्राथमिक शाळांमध्ये अध्यापनशास्त्र, शिक्षक-विद्यार्थी सहसंबंध, विद्यार्थ्यांचे वर्तन आणि शालेय कार्यपद्धतीमध्ये बदल घडवून आणणे हे आहे.

कृती व स्वानुभवाद्वारे मूल्ये आत्मसात करून, स्वतःच्या वर्तवणुकीत बदल करून पालकांना बदलण्याचा आग्रह

मूल्यवर्धनच्या उपक्रमांतून मुलं वाहतूक नियम शिकत आहेत. वाहतूक नियमांच्या उपक्रमाचे नाट्यीकरण करून विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम आत्मसात केले.