घरी करायचे उपक्रम

कोव्हिड 19 च्या लॉकडाऊनमुळे मुलांना आता दीर्घकाळ सुट्टी मिळाली आहे. या सुट्टीत मात्र त्यांना घराबाहेर पडणे किंवा बाहेर खेळणे शक्य होत नाही. अशा प्राथमिक शाळेतील मुलांसाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनने ‘सुट्टीतील उपक्रम’ ही एक छोटी पुस्तिका तयार केली आहे.  या पुस्तिकेच्या आधारे तुम्ही  घरी मुलांचे अनेक उपक्रम घेऊ शकता.

यामुळे मुलांचा वेळ छान जाईल शिवाय भाषा,  गणित,  परिसर आणि कला इत्यादी विषयातील कौशल्ये त्यांच्यात विकसित होतील.