व्याप्ती

मूल्यवर्धनची व्याप्ती

शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने ‘मूल्यवर्धन’ हा कार्यक्रम महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातील अनेक खासगी शाळांमध्ये राबविला जात आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १८५७२ शाळांमध्ये ५०८८७ शिक्षकांपर्यंत आणि ९३३६७१ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. गोवा राज्यात ७८१ शाळांमध्ये १७११ शिक्षकांपर्यंत आणि २२०५६ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. खासगी शाळांमध्ये १८० शाळांमध्ये ६१२ शिक्षकांपर्यंत आणि २०८०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.

कार्यपद्धती

महाराष्ट्र व गोव्याच्या सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन राबविण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने शासकीय शिक्षकांमधूनच प्रशिक्षकांचा (प्रेरकांचा)
खूप मोठा गट (सुमारे ५००० प्रेरकांचा) प्रभावीपणे तयार केलेला आहे.

  • पहिल्या टप्प्यात एस.एम.एफ.च्या मास्टर ट्रेनर्सद्वारे ह्या निवडलेल्या प्रेरकांना तालुका पातळीवर ४ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.
  • त्यानंतर ते प्रेरक स्वतःच्या शाळेत मूल्यवर्धनचा सराव करतात.
  • मूल्यवर्धन प्रशिक्षण सामुग्रीचा परिचय घेण्यासाठी एस.एम.एफ.ने आयोजित केलेल्या २ दिवसीय कार्यशाळेत सर्व प्रेरक सहभागी होतात.
  • अशाप्रकारे त्यांची क्षमता विकसित झाल्यानंतर ते आपापल्या केंद्रांमधील शिक्षकांसाठी केंद्र पातळीवर ४ दिवसीय कार्यशाळा घेतात.
  • १ फेब्रुवारी २०१८ पर्यंत महाराष्ट्रामध्ये सुमारे ३१००० शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण दिले गेले आहे. तसेच गोवा राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये १२०८ प्राथमिक शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण दिले गेले आहे.

प्रशिक्षणाच्या ह्या विशिष्ट पद्धतीमुळे मूल्यवर्धन खूप झपाट्याने लाखो मुलांमध्ये पोहचविले जात आहे.

MV_Implementation_17.2.20.18