लेकीने वाचवले प्राण

1 फेब्रुवारी 2019 संध्याकाळी 7 ची वेळ शेंद्रा midc मधील शिवाजीनगर नेहमीप्रमाणे गजबजलेला होता आणि अचानक मोठा आवाज आला,”मझ्या पप्पाला वाचवा” लोक तिकडे धावले तर घरात डोंगरे जमिनीवर निपचित पडले होते. तोंडातून फेस गळत होता. त्यांना विजेचा जोरदार झटका लागला होता टीव्ही बंद करताना पिनच्या उघड्या वायर ला स्पर्श झाला आणि ते चिटकले. घरात फक्त 10 वर्षांची प्रतीक्षा आणि लहान भावंडे! भल्याभल्याना घाम फोडणारा हा प्रसंग पण iso मानांकित प्रा शा शिवाजीनगर मध्ये शिकणाऱ्या प्रतिक्षाला त्या क्षणी आठवले कि आपल्या वर्गात मूल्यवर्धन तासिकेला सांगितले होते कि, कोणत्याही व्यक्तीला विजेचा झटका लागला तर त्याला स्पर्श न करता लाकडाच्या वस्तू ने त्या व्यक्तीला विद्युत प्रवाहापासून वेगळे करावे. याबद्दलचे प्रात्यक्षिक हि मॅडम ने दाखवले होते. धावतच प्रतीक्षा चुलीजवळ गेली आणि ठेवलेल्या लकडमधील एक लाकूड घेऊन वडीलांचा अंतकाळ ठरू पाहणाऱ्या विजेच्या तारेवर प्रहार केला त्याबरोबर वडील प्रवाहापासून वेगळे झाले आणि जमिनीवर पडले. मग प्रतिक्षाने बाहेर जाऊन लोकांना बोलावले आणि प्रथमोपचार करून त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात भरती केले. 25 दिवसांच्या उपचारानंतर आणि विजेला चिटकलेले बोट काढून टाकल्यानंतर रवींद्र डोंगरे घरी परतले. शाळेत मिळालेल्या मूल्यवर्धन च्या पाठतील ज्ञानाच्या आधारावर एका बेटीने आपल्या वडिलांना जीवदान दिले. आणि “बेटी बचाओ, बेटी पढाओ तब ओ हमे बचायेगी” हे सार्थ करून दाखवले. गितांजली श्रीरंग बेदरे वर्गशिक्षिका व मुख्याध्यापक प्रा शा शिवाजीनगर, केंद्र कुंभेफळ ता. जि. औरंगाबाद. मोबाईल 9765595329

Leave a Message