मूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला

मूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला

 मूल्यवर्धन क्षमता-विकास शिक्षकांचे विचार आणि दृष्टीही बदलत असल्याचे दिसून आले आहे. 

(जिल्हा : पुणे, तालुका : हवेली, केंद्र : लोहगाव, शाळा : लोहगाव)

लोहगाव केंद्रातील जि.प. शाळेतील शिक्षिका तृप्ती तोडकर यांची मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली तेव्हा फक्त शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम असेल, असे त्यांना वाटले होते. पण चार दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या विचारात बदल झाले. त्यांनी हा कार्यक्रम स्वतःच्या शाळेत अंमलात आणण्याचा निर्धार केला. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांत बदल होत असल्याचे हे बोलके उदाहरण होते.

तृप्ती तोडकर याविषयीचा आपला अनुभव सांगतात, “मूल्यवर्धनमुळेच मला मुलांमधील चांगले गुण ओळखता येऊ लागले. मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा पहिला दिवस पार पडला आणि वाटले, उद्याची पिढी मूल्यवर्धनमुळेच चांगल्याप्रकारे घडवू शकू. तोपर्यंत माझे विचार वेगळे होते पण आता त्यात संपूर्ण बदल झाला आहे. माझ्यात बदल झालाच, मुलांमध्येही तो होताना मी पाहते आहे.”

मुलांमध्ये भांडणे होत असत पण मूल्यवर्धनमुळे आपआपसातील वाद स्वत: सोडवू लागली. स्वत:हून अभ्यास करायला लागली. मुले काय अयोग्य गोष्टी करीत आहे, हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर स्वयंप्रेरणेतून बदलायला लागली. वर्गनियम पाळण्यात  शिक्षक जरी चुकले तरी ते त्यांना त्यांची चूक सांगू लागले. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये सभाधीटपणा आला, असे निरीक्षण तृप्ती तोडकर नोंदवतात.

मूल्यवर्धन प्रशिक्षणामुळे माझ्या विचारांत संपूर्ण बदल झाला आहे. माझ्यात बदल झालाच, मुलांमध्येही तो होताना मी पाहते आहे.

– तृप्ती तोडकर, शिक्षिका

1 Recent Comments
  • Rupalipisal April 19, 2019 Reply

    Very nice

Leave a Message