मुले एकत्र आली

माझ्या शाळेत सुरुवातीला दोन गट होती. ती आर्थिक व जातीयता यामुळे तयार झालेली होती. जेवण, खेळणं, उपक्रम असा कोणताही भाग असेल तिथे ही गटबाजी प्रकर्षाने जाणवायची. मनात खूप चलबिचल होत होतं. बऱ्याचवेळा गोडीने, रागावून, शिक्षा करूनही फारसा बदल दिसून आला नाही. त्यामुळे मनात एक प्रकारची निराशा आली होती. परंतु मूल्यवर्धनामुळे आमूलाग्र बदल घडण्यास मदत झाली. आत्ता माझी सर्व मुले सोबत जेवतात, खेळतात, अनेक उपक्रमांत सहभागी होतात. त्यांच्यातील हा बदल कौतुकास्पद आहे. आम्हालाही यातून नवी दृष्टी मिळाली आहे. यातील उपक्रम खूपच विचारपूर्वक, अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक आहेत त्यामुळे यश नक्कीच लाभते. धन्यवाद श्रीम पाटील अनुराधा अशोकराव जि प प्रा शा उचलती वस्ती

Leave a Message