पुस्तके

.

 

मी आणि मूल्यवर्धन

 

मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना आलेले अनुभवकथन करणारे ‘मी आणि मूल्यवर्धन’ हे पुस्तक

शिक्षक उपक्रम पुस्तिका

मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना नियमितपणे वर्गात काही उपक्रमांचे आयोजन करायचे आहे. यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने पहिली ते चौथीच्या प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षक उपक्रम पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू, कोकणी आणि हिंदी भाषेत तयार केल्या आहेत.

विद्यार्थी उपक्रम पुस्तिका

मूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. वर्ग उपक्रमांशी संबंधित कविता, गाणी गोष्टी, चित्रे आणि चित्रांवर आधारित गोष्टी यात दिलेल्या आहेत. भाषा, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव आणि अन्य विषयांच्या अध्ययन निष्पत्तींशी सुसंगत असे काही अतिरिक्त उपक्रमसुद्धा यात दिलेले आहेत.

.

 

मार्गदर्शक पुस्तिका

 

मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू, कोकणी आणि हिंदी भाषेत तयार केलेल्या आहेत.