प्रतिसाद

शिक्षक, शासकीय अधिकाऱ्याना काय वाटते ?

मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वागणुकीत बदल झाल्याचे पालकांनी मान्य तर केलेच आहे, पण शिक्षक, जिल्हा परिषदेचे उच्चपदस्थ अधिकारी काय म्हणतात ते समजून घेऊया…

विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया

मूल्यवर्धनमुळे झालेला बदल सांगताहेत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कन्याशाळेतील मुली आणि धामणगाव येथील पौन्धे तीरमल वस्तीवरच्या मीरा या मुलीचे मनोगत :

पालक काय म्हणतात?

शाळेतील मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुले कमालीची बदलत आहेत… बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यतील पालकांचे मनोगत.

मूल्यवर्धनमुळे मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आत्मविश्वास वाढतो आहे. स्पष्ट बोलणे, आपल्या वर्गाचे नियम सर्वांनी पाळणे आदी चांगले बदल घडत आहेत. हा मूल्यवर्धन कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवू.

श्री. डॉ. सी. एल. पुलकुंदवार,

श्री. डॉ. सी. एल. पुलकुंदवार,

मुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदिया

गडचिरोली जिल्ह्यातील तळोधी केंद्रामध्ये मूल्यवर्धनमुळे बदल होताना दिसत आहेत. मुलांमध्ये इतके बदल होत आहेत की, इयत्ता पहिली, दुसरीची मुले घरी आई-वडिलांना शौचालय बांधण्यासाठी आग्रह करीत आहेत. ही समज त्यांच्यामध्ये मूल्यवर्धनमुळे आली आहे.

श्री. गौतम मेश्राम

श्री. गौतम मेश्राम

केंद्र प्रमुख, गडचिरोली

मूल्यवर्धन हा कार्यक्रम वयानुरूप असून भारतीय राज्यघटनेतील मूल्ये याचा आधार आहे़त. याचा उपयोग शाले़य विद्यार्थी हे, भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक घडण्याकरिता होईल.

श्री. किशोर काळे

श्री. किशोर काळे

उपशिक्षणाधिकारी, चंद्रपूर

इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा माझा मुलगा आर्यनने माझे तंबाखूचे व्यसन सोडविले. मूल्यवर्धनमुळे त्याच्यात होणारे बदल आम्ही पाहत होतो. माझ्या मुलाने मला, तंबाखूचे व्यसन चांगले नाही व ते शरीराला अपायकारक असल्याचे सांगितले, त्याच वेळी मी तंबाखू न खाण्याचा निर्णय घेतला.

श्री. संतोष गोसावी

श्री. संतोष गोसावी

पालक, उस्मानाबाद

'खरे बोलण्याचे बक्षीस', 'वागायचे कसे', 'आधी विचार मग आचार' इत्यादी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, जबाबदारीची जाणीव, प्रामाणिकपणा, स्वतःचे व समाजाचे हित ही मूल्ये रुजत आहेत.मूल्यवर्धन उपक्रमांमधल्या मूल्यांच्या शिकवणुकीमुळेच हे शक्य झाले.

शेख नावेद शेख सिकंदर

शेख नावेद शेख सिकंदर

विद्यार्थी, इयत्ता- ५ वी, बुलढाणा

'असे वागले तर', 'चांगली मुले', 'वागायचं कसं', 'दाखवू आदर', 'आनंदाचे मोजमाप', 'चांगल्या वाईट सवयी', 'कोणाला काय वाटेल'?, 'माझ्यातील गुण आणि कौशल्ये', 'मित्राचे गुण', 'दुसऱ्याच्या बाजूने विचार करूया' इत्यादी उपक्रमांमुळे मुले खूप आनंदी व उत्साही झाली असून ती प्रत्येक गोष्टीवर विचार करू लागली आहेत व इतरांना मदतही करू लागली आहेत.

सय्यद शहजाद

सय्यद शहजाद

उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका, नाशिक

मूल्यवर्धनमुळे मुले आनंदी झाली आहेत व त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल झाल्याची जाणिव पालकांना झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी उत्साह वाटू लागला आहे व सर्व गावकऱ्यांनी आपल्या वर्गणीतून या शाळेच्या भिंतीवर माहिती व उपक्रम रंगविले असे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता इतक्या दुर्गम आदिवासी भागात पालकांनी इतके जागरूक होऊन, कुणीही न सांगता त्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाची दखल घेतली आहे.

श्री. महेंद्र धीमते

श्री. महेंद्र धीमते

केंद्र प्रमुख, ठाणे

मुलांमध्ये जे बदल होत आहेत तो मूल्यवर्धनचा प्रभाव असल्याचे पालकांचे मत आहे. त्यामुळे सर्व पालक समाधानी आहेत. पालकांचे उत्तम सहकार्य शिक्षकांना मिळत आहे.

श्री. राजन कुलकर्णी

श्री. राजन कुलकर्णी

केंद्रप्रमुख, सोलापूर

मूल्यवर्धन हा उपक्रम काळाची गरज असून त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास या कार्यक्रमाची मदत होत आहे.

श्री. रमेश गाढवे

श्री. रमेश गाढवे

गट शिक्षणाधिकारी, मोहाडी, भंडारा